मालवण : चिंदर सडेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

शेअर करा

मालवण,दि.१५ जून

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंदर-सडेवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत यावेळी करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौं. स्वाती सुर्वे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, किरण कांबळी, मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, पालक सौ. प्रिती कांबळी, सौ. स्वरा घागरे, सौ. मानसी गोसावी, सौ. करिष्मा कानविंदे, सौ. गायत्री वाक्कर, सौ. सुहासिनी गोसावी, सौ. रेश्मा हडकर, सौ. धनश्री गोसावी, सौ. सायली तेली तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व विध्यार्थी यांचे स्वागत उपस्थित मान्यवर, शिक्षक व पालक यांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी प्रशालेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शासनाच्या वतीने मोफत पाठयपुस्तके व गणवेश यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

शेअर करा