मातोंड येथे कुटुंब व्यवस्था आणि बाल व युवती संस्कार यावर व्याख्यान

शेअर करा


वेंगुर्ला,दि.२४ जून

मातोंड येथील सकल हिंदू मित्रमंडळींच्यावतीने समाज प्रबोधन करण्याच्या हेतूने कुटुंब व्यवस्था आणि बाल व युवती संस्कार यावर 27 जून रोजी सकाळी 10 वा. रवळनाथ विद्यामंदिर, प्राथमिक शाळा नं.1, मातोंड येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांची जीवनशैली, सामाजिक वर्तन, मुलांचे संस्कार यावर प्रबोधन करण्यासाठी सचिन नाईक (गोवा) आणि बालसंस्कार विषयावर सौ.गावस्कर या मार्गदर्शन करणार आहेत. तरी यावेळी शाळकरी मुलांनी तसेच पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा