मुंबई,दि.२३ जून
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते मुंबईत दाखल होवून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.