Phondaghat : विजाच्या कडकडाटासह फोंडाघाट परिसरात अचानक आलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ

शेअर करा

फोंडाघाट,दि.०५ ऑक्टोंबर (संजय सावंत)
आज सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक परतीच्या पावसाने विजाच्या कडकडाटसह हजेरी लावल्याने आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
दरम्यान काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या वाढत्या उष्णतेने त्रस्त झालेल्या फोंडाघाटवासीयांना सोमवारी दुपारी अचानक झालेल्या जोरदार पावसाने सुखद धक्का दिला.
सोमवार फोंडाघाट चा आठवडी बाजार असल्याने आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक आठवड्याचा भाजीपाला व अन्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आलेले तसेच श्री देव राधाकृष्ण सप्ताहाचा सहावा दिवस असल्याने भाविकांची ही मोठी गर्दी झाली होती. याचदरम्यान विजाच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठेतील व्यापारी, भाजी विक्रेते तसेच नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने . भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर लावलेला भाजीपाला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली तरी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. तसेच पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा