सावंतवाडी : सांगेली येथे अवैध गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई

शेअर करा

सावंतवाडी,दि.१९ जून
सांगेली देवकरवाडी येथे बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
​अजित दत्ताराम नाईक (वय ५८, रा. सांगेली देवकरवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या ‘नॅशनल डॉक्टर’ ब्रँडच्या ७५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा साठा बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आला होता.
​सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक, पोलीस हवालदार श्रीमती दूधवडकर आणि पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १८ जून) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

शेअर करा