सावंतवाडी, दि. २० जून
आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार, २३ जून रोजी आयोजित करण्यात आलेली मायनिंग विरोधी जनजागृती रॅली काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. समितीच्या वतीने यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली.
ही रॅली मंगळवारी सायंकाळी ४ वाजता श्री देव वेतोबा मंदिर (आजगाव) येथून सुरू होणार होती. तिथून शिरोडा मार्गे श्री देव वेतोबा मंदिर (आरवली) येथे पोहचल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर होणार होते. या रॅलीसाठी आजगाव दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, युवक, महिला व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
मात्र, काही कारणांमुळे ही रॅली सध्या स्थगित करण्यात आली असल्याचे आजगाव दशक्रोशी मायनिंग विरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे.