महोत्सवाचे २९वे वर्ष; महाराष्ट्रासह देशभरातील नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थांना सहभागाची संधी
सावंतवाडी,दि.०३ ऑक्टोंबर
बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२७’ अंतर्गत ‘कै. बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धा’ दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
नाट्यमहोत्सावाचे हे २९वे वर्ष असून या महोत्सवाने संपूर्ण महाराष्ट्रात व शेजारील राज्यांत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. कुडाळचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या या महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ही या महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गेल्या २९ वर्षांत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व गोवा येथील नामवंत नाट्यसंघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
भारतातील कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थांच्या मराठी गद्य नाटकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. अंतिम फेरीत एकूण ७ संघांना प्रवेश दिला जाईल.
अंतिम फेरीत निवड झालेल्या प्रत्येक संघास सादरीकरणानंतर रु. २५,०००/- निर्मिती सहाय्य दिले जाईल. तसेच प्रयोगाच्या दिवशी व्यवस्था, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र आयोजकांतर्फे पुरवले जाईल.या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जात नाही.
अर्जाची अंतिम तारीख: इच्छूक संघांनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाठवणे बंधनकारक आहे.
प्राथमिक फेरी (तालीम/प्रयोग पाहणी): आयोजक संस्थेचे निवड मंडळ दि. १४ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान संघटकांचे प्रयोग किंवा रंगीत तालमी पाहून अंतिम ७ संघांची निवड करेल. यासाठी निवड झालेल्या संघांना दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी वेळ व तारीख कळवली जाईल. अंतिम फेरीत निवड झालेल्या संघांना दि. ०१ डिसेंबर २०२६ पर्यंत कळवण्यात येईल.
स्पर्धेतील भरघोस पारितोषिके:
संस्थाकरिता पारितोषिके:
प्रथम: रु. ५०,०००/-, प्रमाणपत्र व फिरता चषक
द्वितीय: रु. ३०,०००/-, प्रमाणपत्र व फिरता चषक
तृतीय: रु. २०,०००/-, प्रमाणपत्र व फिरता चषक
वैयक्तिक व इतर पारितोषिके (प्रत्येकी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह):
दिग्दर्शन, संगीत, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट नेपथ्य, वैयक्तिक अभिनय (पुरुष) आणि वैयक्तिक अभिनय (स्त्री):
प्रथम: रु. १,०००/-
द्वितीय: रु. ७००/-
तृतीय: रु. ५००/-
सर्वोत्कृष्ट रंगभूषा: रु. १,०००/-
उत्तम व्यवस्थापित संघ पारितोषिक: रु. १,०००/- (पडद्यामागे शिस्तबद्ध वर्तन व उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या संघासाठी)
संपर्क व प्रवेश अर्ज:
स्पर्धेची नियमावली, माहितीपत्रक व प्रवेश अर्जासाठी इच्छूक संघांनी खालील पत्यावर संपर्क साधावा:
कार्यवाह, नाट्यमहोत्सव आयोजन समिती,
बाबा वर्दम थिएटर्स, द्वारा- श्री. आनंद वैद्य, ‘निलेंदू’, ॲक्सिस बँकेच्या मागे, कुडाळ- ४१६५२०, जि. सिंधुदुर्ग.
मोबाईल क्र.: ८२७५३९०९०९
ई-मेल: [email protected]
या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.