सावंतवाडी : बाळकृष्ण राणे यांच्या ‘ सुंदरवाडी: मधाळ स्वप्नांचं गाव’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

शेअर करा

सावंतवाडी,दि. २२ जून
‘सुंदरवाडी मधाळ स्वप्नाच गाव’ हे बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या गाजलेल्या ललित लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार २७ जून २०२६रोजी सकाळी १०.३० वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे होणार आहे. हे प्रकाशन श्री पंचम खेमराज महाविद्यालय १९८२ सायन्स बॅच यांच्यावतीने आयोजित केलेले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत खेमसावंत भोसले व सौ.शुभदादेवी भोसले, ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर ठाकूर, कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर, प्राचार्य डॉ. डी.बी. भारमल आदी उपस्थित राहणार आहेत.या पुस्तकात सावंतवाडीतील व्यक्ती, वल्ली, स्थळे, देवालये, नरेंद्र डोंगर,मोती तलाव, चितार आळी,वाडीतील क्रिकेट ,भाजी मार्केट, गोविंद चित्र मंदिर असे अनेक विषय रंजक व माहितीपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. सावंतवाडीचा इतिहास, संस्कृती, शैक्षणिक व सामाजिक प्रगती यांचा आढावा यात घेतलेला आहे. १९७० ते २०२६, या कालावधीतील सावंतवाडी या पुस्तकात दिसते. प्रत्येक वाडीकराच्या संग्रही असलच पाहिजे असं हे पुस्तक असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी १९८२ सायन्स बॅच मार्फत करण्यात आले आहे.

शेअर करा