सावंतवाडी : आजगाव ड्रोन सर्वेक्षण प्रकरणी ४० ते ५० जणांवर गुन्हे; जेएसडब्ल्यू कंपनीच्या उपाध्यक्षांच्या तक्रारीनंतर कारवाई

शेअर करा

मारहाण व ड्रोनसह साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप; सावंतवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल, प्रकरणाला नवे वळण

सावंतवाडी,दि.१६ जून
आजगाव येथे मायनिंग प्रकल्पाच्या ड्रोन सर्वेक्षणसाठी आलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या उपाध्यक्षांसह अन्य पाच मिळून एकूण सहा जणांना मारहाण करून ड्रोन व अन्य साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी चाळीस ते पन्नास जणावर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कंपनीचे उपाध्यक्ष सुब्रमण्यम नागेंद्र यांनी तक्रार दिली आहे.
आजगाव सह दहा गावांमध्ये मायनिंग प्रकल्प प्रस्तावित असून त्या ठिकाणी सोमवारी जेएसडब्लू कंपनीच्या वतीने मॅग्नेटिक ड्रोन द्वारे सर्वेक्षण सुरू होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष


सुब्रमण्यम नागेंद्र व त्यांचे दोन अधिकारी आणि ड्रोन सर्व्हे करणाऱ्या टेक्निकल टीम मधील तीन कर्मचारी दुपारी हॉटेल राजगड रिसॉर्ट येथे असताना तिथे आलेल्या अज्ञातांच्या जमावाने हॉटेल मध्ये घुसून ड्रोन व साहित्याची तोडफोड केली व उपाध्यक्ष नागेंद्र आणि अधिकारी तसेच सर्व्हे करणाऱ्या टीम च्या सदस्यांना ही मारहाण केली. त्यांनतर त्यांना घेऊन ते आजगाव येथे दाखल झाले यावेळी तिथेही जमावाने त्याना शिवीगाळ करत धमकी दिली असे नागेंद्र यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेत जमावातील चाळीस ते पन्नास जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करीत आहेत.

शेअर करा