सावंतवाडी : वृद्धेची चेन हिसकावून पसार झालेले चोरटे कोल्हापूरचेच; पोलिसांचा तपास वेगात

शेअर करा

सीसीटीव्हीत कैद झालेल्या संशयितांचा पूर्वीही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा मागावर, लवकरच अटकेची शक्यता

सावंतवाडी,दि. ११ जून
सावंतवाडी खासकीलवाडा येथील कॉसमॉस पराडाईज परिसरात वृद्धेच्या गाळ्यातील चैन खेचून पलायन करणारे अज्ञात चोरटे कोल्हापुरातील असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. सावंतवाडी येथे घटनेवेळी हे चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले होते याच चोरट्यांनी कोल्हापुरात अशाच पद्धतीने चोरीचे प्रकार केले असून त्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे नोंद आहेत त्यामुळे या गुन्ह्यात त्यांचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे अशी माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.


सावंतवाडी खासकीलवाडा येथील कॉसमॉस पराडाईज बिल्डिंग परिसरात बागेत काम करणाऱ्या एका वृद्धेच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी खेचून दुचाकी वरून पलायन केले होते. यात एकूण ५० हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेवेळी चोरटे ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले होते. ते फुटेज पोलिसांनी मिळवत कोल्हापूर रत्नागिरी येथे पाठवले होते. यावरून कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी याच चोरट्यांनी अशाच पद्धतीने चोरीचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर गुन्हे ही दाखल आहेत सीसीटीव्ही फुटेज मधील चोरटे कोल्हापुरातील असल्याचे पोलीस तपासत समोर येत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत याबाबत अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करत आहेत.

शेअर करा