सावंतवाडी शहर : सुधाताई कामत शाळा नं. २ मध्ये अंगणवाडी सेविका सन्मान कार्यक्रम उत्साहात

शेअर करा

सावंतवाडी दि.३ ऑक्टोबर
सुधाताई कामत शाळा नं. २ सावंतवाडी येथे आंगन का उत्सव या कार्यक्रमानिमित्त अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांचा सन्मान सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर व महिला बालकल्याण सभापती “अंगण का उत्सव “कार्यक्रम संयोजिका सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला
तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडल शहर अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका सौ.दिपाली भालेकर यांनी केले तसेच सभापती सुधीर आडिवरेकर सभापती आनंद नेवगी सभापती मोहिनी मडगावकर तसेच भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी या कार्यक्रमास मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा सभापती सुधीर आडीवरेकर सभापती आनंद नेवगी सभापती दिपाली भालेकर सभापती मोहिनी मडगावकर शहर सरचिटणीस दिलीप भालेकर उपसभापती सुनीता पेडणेकर नगरसेविका नीलम नाईक सुकन्या टोपले मिसबा शेख मेघना साळगावकर मीना दाभोलकर मेघना भोगटे साक्षी गवस तृप्ती विरनोडकर ज्योती मुद्राळे रूपाली रेमुळकर दोन नंबर शाळेचे मुख्याध्यापक अंजीवडेकर सर अनुराधा पवार आणि अमिषा सासोलकर पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार अनुराधा पवार यांनी मांडले

शेअर करा