सावंतवाडी : आंबोली आजरा फाट्यावर रात्री कंटेनर पलटला : अपघाताची नोंद

शेअर करा

सावंतवाडी,दि.०१ जुलै

सावंतवाडी बेळगाव राज्यमार्गावरील आंबोली आजरा फाटा लगत मंगळवारी ३० रोजी रात्री पेट्रोल वाहतूक करणारा एक कंटेनर पलटी झाला. सांगलीहून वेंगुर्ले मठ या दिशेने जाणारा हा कंटेनर श्री भवन रस्त्या लगत कलंडला. या कंटेनरमध्ये केवळ चालत होता मात्र त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर आंबोली पोलीस हवालदार संतोष गलोले त्यांच्यासह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने हा कंटेनर बाजूला केला. कंटेनर खूप मोठा असल्याने मदत कार्यासाठी सावंतवाडीचा अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. अखेर कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

शेअर करा