राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून रबरी बोट हाताळणी व संचालनाचे प्रात्यक्षिक; सावंतवाडी उपविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग.
सावंतवाडी,दि.०२ जुन
मान्सुनपूर्व तयारीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, पुणे यांच्याकडून रबरी बोट हाताळणे व चालविण्यासाठीचे प्रशिक्षण सावंतवाडी उपविभागातील अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचेही अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. येथील मोती तलाव येथे हे प्रात्यक्षिक देण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभारी अधिकारी जिविशा विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदींसह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला उप विभागातील ग्रामविकास अधिकारी, पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते