​​सावंतवाडी : सावंतवाडी शाळा क्रमांक ४ मध्ये वकिल कै श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्याचे वाटप

शेअर करा

​सावंतवाडी, दि. १६ जून

सावंतवाडी शहरातील शाळा क्रमांक ४ येथे शाळेच्या मुलांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर वह्या रिक्षा युनियनचे नेते सुधीर पराडकर व कुटुंबियांच्या तर्फे अँड. कै. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आल्या.
​या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार सिताराम गावडे, अँड. गुरुनाथ पराडकर, उद्योजक विनायक कोडल्याळ, श्री. सुरेश वीरनोडकर, डॉक्टर कांचन वीरनोडकर, मीरा सिंग, साईश बांदेकर, शिक्षक महेश पालव, इतर सहशिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी पराडकर कुटुंबियांचे आभार मानले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा