सावंतवाडी : नेमळे विद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

शेअर करा

पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; लोकमान्य टिळकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावी भाषणे, मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन.

सावंतवाडी,दि.०२ ऑगस्ट

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून पाचवी ते आठवी या लहान गटात व नववी ते बारावी यामोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भारतीय असंतोषाचे जनक, भारतमातेचे अनमोल रत्न लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाची महती नेमळे शाळेतील विद्यार्थांनी आपल्या भाषणांतून व्यक्त केले.विद्यालयाचे प्राचार्य आर.के.राठोड यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख मार्गदर्शक सी .टी बंगाळ, स्पर्धेचे परीक्षक राजेश गुडेकर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे ,एम.पी .सारंग, नितिन धामापूरकर , लवू जाधव , उमेश राऊळ, एन. कडावलकर, आरती कोरगावकर, सांस्कृतिक मंत्री सायली आळवे या सर्वाच्या हस्ते फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .विद्यार्थिनी प्रतिनिधी गावडे हिने व्यासपीठावर उपस्थित गुुरूनांंचे पुष्प देऊन स्वागत केले.


कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सी.टी बंगाळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,” लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांतून ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांना एकत्र आणले व गणेशोत्सव साजरा केला.लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना त्यांनी निर्माण केली.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर.के राठोड म्हणाले'” मुलांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श घ्यावा तसेच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचावे”.


पाचवी ते आठवी यालहान गटांत प्रथम – चिन्मय लक्ष्मण कांदे ( आठवी), द्वितीय- साक्षी कमलेश भैरे ( सातवी), तृतीय – वैभवी पाटकर ( सहावी) , उत्तेजनार्थ-दीपेश विटेकर ( आठवी)
मोठ्या गटांत प्रथम क्रमांक- अक्षय परशराम कक्केरकर ( दहावी), द्वितीय- सायली संदिप आळवे( दहावी), तृतीय – सानवी लिलाधर राऊळ ( बारावी काॅमर्स)
उत्तेजनार्थ – अनुष्का धावडे
सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले आभार एम.पी सारंग यांनी मानले.

शेअर करा