सावंतवाडी, दि. १५ जून
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा सुरू होऊन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. या पहिल्याच दिवशी चराठा येथील बावतीस फर्नांडिस कुटुंबियांच्या वतीने माजगाव येथील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.