नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेचा उपक्रम; शहरातील विविध ठिकाणी आधुनिक कचरा पेट्या बसविण्यात आल्या.
सावंतवाडी, दि.३० मे
शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आधुनिक कचरा पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून शहरात ठिकठिकाणी या पेट्या ठेवण्यात आल्यात. स्वच्छ व सुंदर सावंतवाडीसाठी ही संकल्पना राबविण्यात आली.
शहरातील कचरा कुंड्या काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होते. या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून सावंतवाडी न.प.ने एक पाऊल स्वच्छतेकडे टाकलं आहे. नगराध्यक्षांच्या पुढाकारातून प्रशासनाकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. ओला आणि सूका कचरा वर्गीकरण होणार असून तशी सोय करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांकडून कचरा कुंड्या उपसण्याचे प्रकार बघता यावेळी चांगली शक्कल लढवून तशी रतचा करण्यात आली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेला हातभार लागणार आहे.