सावंतवाडी : मळगाव येथील अपघातात माळेवाड येथील तरुण गंभीर

शेअर करा

सावंतवाडी,दि.२ जून (प्रतिनिधी)
सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर दुचाकी आणि कार या मध्ये झालेल्या अपघातात ओंकार आनंद कारिवडेकर ( २२ वर्ष ) राहणार माळेवाड हा युवक गंभीर जखमी असून त्याच्या सोबत सहकाऱ्याला ही दुखापत झाली आहे.
पल्सर दुचाकीस्वार मळेवाडच्या दिशेने जात होता तर अल्टो कार ही सावंतवाडी दिशेने जात होती. रेल्वे स्टेशन समोर दोन्ही वाहना मध्ये जोरदार धडक झाली. यात ओंकार दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला.
दरम्यान सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या १०२ रुग्णवाहिकीने दोन्ही जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

शेअर करा