वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका; विद्युत वाहिनी तुटल्याने कामळेवीर-नेमळे परिसरातील वीजपुरवठाही खंडित.
सावंतवाडी,दि.२३ जून
बेळगांव वेंगुर्ला महामार्गांवर कामळेवीर बाजारपेठ येथे आज दुपारी वादळी वारे आणि मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे महामार्गाच्या कडेला असलेले महाकाय वडाचे झाड बाजारपेठेतील रस्त्यावर कोसळल्यामुळे वेंगुर्ला बेळगांव महामार्गवरील वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाची माणसे येई तोवर बंद होती तसेच विद्युत वाहिनी ही तुटल्या मुळे कामळेवीर नेमळे परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झाला होता
.
वेंगुर्ले बेळगांव महामार्गांवर रस्त्याच्या कडेला शंभर दीडशे वर्षाचे जुनाट वृक्ष धोकादायक अवस्थेत आहेत एक दोन वेळा पावसाळ्यात वाहन चालकांच्या अंगावर वाहनावर वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला याविषयी वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे या अशा प्रकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे कुणावरही जीवघेणा प्रसंग येऊ शकतो यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेंगुर्ला बेळगांव महामार्गाच्या बाजूचे सर्व धोकादायक वृक्ष तोडावेत किंवा महाकाय वृक्षाच्या फांदया ची शाटणी करावी अशी मागणी वाहन चालक तसेच कामळेवीर बाजारपेठेतील ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे