सावंतवाडी, दि. ०७ जुलै
सावंतवाडी तालुक्यातील वैश्य वाणी ज्ञातीतील गुणवंताचा गुणगौरव साोहळा रविवार दि.19 जूलै रोजी सावंतवाडी वैश्य समाज व हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे.
येथील कळसूलकर इंग्लिश स्कुलच्या सभागृहात दि.19 जूलै 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या गुणगौरव सोहळयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात वैश्य वाणी ज्ञातीतील दहावी, बारावी, पदवी, पदव्यूत्तर परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या तसेच इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंतांचा तसेच इतर विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केलेल्या व्यक्तिंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. यासाठी दहावी व बारावी परिक्षेत 75 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविलेले तसेच पदविका , पदवी परिक्षेत 60 टक्के व त्याहुन अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले गुणवंत तसेच पदव्यूत्तर परिक्षेत व इतर क्षेत्रात नेत्र दिपक कामगीरी केलेल्यानी तसेच इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंतांनी दि.15 जूलै 2026 पर्यंत गुणपत्रकाच्या छायांकित प्रतीसह आपली नावे नित्यानंद कोरगांवकर, कोरगांवकर बुक स्टॉल, हॉटेल मँगो शेजारी, बाजारपेठ सावंतवाडी यांचेकडे दयावीत, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.