सावंतवाडी, दि. ०८ जुलै
गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला असून त्या परीक्षेमध्ये मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थांनी ‘सिल्वर गटामध्ये’ यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी मधून कु. रुद्र देसाई तसेच इयत्ता आठवी मधून कु. शुभंकर पाटकर आणि कुमारी जान्हवी गावडे हे विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थांचे प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर रीचर्ड सालढाणा यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.