सावंतवाडी : झिरंगवाडीतील गटार बांधकामाला नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही

शेअर करा

म्हाडा कॉलनी ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक ७ दरम्यानचे काम नगरसेवक देवेंद्र टेमकर यांच्या पुढाकारातून मार्गी; नागरिकांना दिलासा मिळणारसावंतवाडी :

सावंतवाडी,दि.०४ जुन

झिरंगवाडी मधील म्हाडा कॉलनी ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक ७ पर्यंतच्या गटार बांधकामास सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडून ग्वाही देण्यात आली असून नगरसेवक देवेंद्र टेमकर यांच्या पुढाकारातून हे काम होत आहे.

झिरंग म्हाडा कॉलनी ते जि प शाळा क्रमांक ७ पर्यंतचे गटारात ६ ते ७ वर्षे येथील गटारांचे उपसा साफसफाई झालीच नव्हती. तसेच तेथे वारंवार वन्यप्राणी गवारेड्यांचा त्रास जास्त प्रमाणात असल्याने रस्त्यावरून चालणे अवघड बनले होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना व्हायचा. त्याचप्रमाणे गटार उपसा न झालेले असल्याने पावसाच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर गटर नसल्याने पावसाचे पाणी साचून रस्त्यावरून ये-जा करणे कठीण बनले होते. वारंवार नगरपरिषदेकडे मागणी करूनही मागील काही वर्षात प्रशासकीय कार्यकाळ असल्याने गटाराचे काम झाले नाही. या परिस्थितीचा होणारा त्रास तेथील ग्रामस्थांनी नगरसेवक देवेंद्र टेमकर यांच्याकडे मांडला. त्यावर लागलीच नगरसेवक श्री. टेमकर यांनी तेथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ घेऊन सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे 40 ते 50 जणांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर केले. त्या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याधिकारी यांनी त्यावर त्वरित कार्यवाही करत संबंधित प्रभागातील गटार साफसफाई करून घेण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक देवेंद्र टेमकर यांच्या पुढाकाराने काम होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेवक टेमकर यांच्यासोबत अभिमन्यू नाईक, अशोक नाईक, महादेव कळणेकर, नंदनी वेंगुर्लेकर, जॉन डोनटस, अनुज नाईक, संतोष बांदकर, हर्षद नाईक, दीपा कळणेकर, पाॅल पिंटो, धनश्री मराठे, एलबीन रोड्रिक्स, मिलिंद वीरनोडकर, स्टॅन्ली डिसोजा, स्वरा लोंढे, हृदय रोड्रिक्स, थॉमस फुतार्डो, हेमंत राऊळ, राजन मांडेलकर, मंगेश मांडेलकर, प्रवीण मांडेलकर, फ्रान्सिस रोड्रिक्स, क्लारा रोड्रिक्स, रूपाली नाटेकर, जेनिस रोड्रिक्स, सी रोड्रिक्स, शंकर सावंत, मंदाकिनी चव्हाण, गणेश पंडित, भारती भरडे, विजय बेळगावकर, सागर मांडेलकर, मोजेस रोड्रिक्स, संदेश टेमकर, कृष्णा बेळगावकर, अर्जुन नाईक, अजय जाधव, अभिजीत बावकर आदी उपस्थित होते.

शेअर करा