सावंतवाडी,दि.०१ जुलै
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित शुभेच्छापर सत्कार समारंभ विद्या विकास च्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अनिल नाईक,संस्थेचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश परब, सचिव राजन नाईक, खजिनदार संदिप नेमळेकर , आरोस गावचे सरपंच तथा प्रशासक शंकर नाईक ,साक्षी नाईक,संस्था सदस्य श्रीकृष्ण खोत, अर्जुन मुळीक, विश्वंभर नाईक, विजय रेडकर, माजी संस्था सदस्य शिवाजी परब, बाबू नाईक,शरद परब, विद्याविहार इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक शांताराम गावडे , विद्यमान मुख्याध्यापक सदाशिव धुपकर , विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. डामरेकर , विद्याधर देसाई ,शिरीष नाईक, माजी शिक्षक एल .सावंत ,शांताराम आसोलकर ,समिधा मांजरेकर , संगीता रेडकर , आरोस ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुनील नाईक, बाळा नाईक, विजय नाईक , नियोजित नाईक ,संजू पांगम,प्रकाश गावडे तसेच शिक्षक अनिल नाईक यांचा परिवार उपस्थित होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अनिल नाईक यांच्या कार्यबद्दल आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. उपस्थित मान्यवरांनीही श्री.नाईक यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तानाजी वरक,देवयानी चव्हाण श्रद्धा मुळीक , मिताली नाईक, तानाजी खोत,कृपा नेमळेकर , सावंत मॅडम , आजी माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवयानी चव्हाण तर प्रस्तावना मुख्याध्यापक तानाजी वरक तर आभार श्रध्दा मुळीक यांनी मानले.