सावंतवाडीत १० जुलैपासून पूर्ववत वेळेनुसार पाणीपुरवठा; नगरपरिषदेची जाहीर सूचना

शेअर करा

​सावंतवाडी,दि.९ जुलै


सावंतवाडी शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने नगरपरिषदेमार्फत १५ एप्रिल पासून सुधारित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता पावसाळा सुरू झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्याचा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेने घेतला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवार, दिनांक १० जुलै पासून शहरात पूर्ववत वेळेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे.
​याबाबत सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून, शहरातील नागरिकांनी या बदललेल्या (पूर्वीच्या) वेळेची नोंद घ्यावी व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.

शेअर करा