सावंतवाडी,दि. १० जून
सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रहिवाशांना सध्या एका क्रिकेट अकादमीमुळे खूपच त्रास होत असून वारंवार सांगूनही गोंगाट होत असल्याने अखेर मुख्याधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
शिल्प ग्राम मार्गावर नाडकर्णी हॉल जवळ हि अकादमी असून आजूबाजूला अनेक रहिवासी घरे, संकुल आहेत. सदर अकादमी भरदुपारी ३.३० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते. मुलांचा गोंगाट एवढा असतो कि घरातल्या घरात काही ऐकायला येत नाही.तसेच मुख्य रस्त्यावरच गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या परिसरात वयोवृद्धांची जास्त आहे. उच्च रक्तदाब, हृदय रोगी, आहेत. त्यांना कमालीचा त्रास होत आहे. त्यामुळे सदर अकादमी बंद करून या त्रासापासून वाचवा अशी विनंती रहिवाशांनी केली आहे.
या निवेदनावर सुरेश निर्गुण,उदय निर्गुण,समीर पडते, वैशाली मयेकर, निलेश निर्गुण, संदीप राणे,वामन कविटकर, मयुर सुभेदार, रामकृष्ण परब, चंद्रहास विचारे, गजानन सुभेदार, अशा अनेकांनी सह्या केल्या आहेत.राजेश सावंत, महेश पांचाळ, क्षमा नंदादीप विचारे, यांच्या सह अनेकांनी सह्या केल्या आहेत.