Sawantwadi : आरपीडी प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

शेअर करा

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव; सचिव व्ही. बी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

सावंतवाडी,दि.१० ऑक्टोबर

आरपीडी प्रशालेत विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न – कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सचिव व्हि.बी.नाईक यांनी भूषवले. संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्हि. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य प्रा. बागवे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक श्री.मुठे, माजी मुख्याध्यापक श्री. ढोकरे पाटील, माजी उपप्राचार्य श्री. नंदीहळी, माजी कलाशिक्षक श्री.मालवणकर, माजगाव गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कानसे, माजी शिक्षक श्री. नाईक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून त्याचप्रमाणे सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. त्यांनी प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली.
शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेले यश पुढे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा कायम ठेवावे आगामी काळात आपल्या प्रशालेतून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावे राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची यशाची परंपरा कायम ठेवावी यशाने हुरडून न जाता त्यात सातत्य राखावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास भाई सावंत यांनीही दुरुस्थ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रशालेच्या वतीने शाळेत विशेष वर्ग राबविण्यात येत आहे त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी अधिक यश संपादन करावे असे आवाहन केले.


यावेळी प्रशालेतील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मानचिन्ह व रोख रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन पूनम कोचरेकर यांनी केले. यावेळी शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा