Sawantwadi news:सावंतवाडीचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मातेचे संजू परब यांनी घेतले दर्शन

शेअर करा

देवीचरणी नतमस्तक होत घेतले आशीर्वाद; शिवसेना पदाधिकारी, मानकरी व ग्रामस्थांची उपस्थिती

सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोंबर

सावंतवाडी शहराचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मातेचे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, संजय माजगावकर, रुपेश नाटेकर, राजू कुबल आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच चराठा गावचे प्रमुख मानकरी, देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते.

शेअर करा