सावंतवाडी ,दि.१५ जून
मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी व सेंट्रल उर्दू हायस्कूल आणि जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या प्रशालांमध्ये २०२६- २७ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोष व
उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारासमोर रंगीत फुग्यांची सजावट तयार करून शालेय इमारतीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .
स्वागत समारंभाच्या सुरुवातीला सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापूरी यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम.निलोफर बेग, सचिव परवेज बेग, खजिनदार. इस्माईल शेख , विश्वस्थ. फरहीन खान ,. सोहराब बेग ,. खलील खान, मियासाहेब अब्दुल राजगुरू , . अब्दुल रहिम बागवान
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम.निलोफर बेग यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या . तसेच संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .सर्वांनी विद्यार्थ्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उत्साहपुर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली .