ग्रामसभेच्या ठरावाला डावलून सर्वेक्षण केल्याचा आरोप; संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत तीव्र विरोध दर्शवला
सावंतवाडी,दि.१६ जून
आजगाव दशक्रोशीत प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असतांना आणि तशा प्रकारचा ग्रामसभेचा ठराव असताना ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता एका मायनिंग कंपनीकडून आजगाव परिसरामध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे जमिनीचे सर्वेक्षण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उशिरा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला, यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हा ड्रोन उडवणाऱ्या संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत त्यांना जाब विचारला यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोशाला सामोरे जावे लागले. यावेळी मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सावंतवाडी व वेगुर्ले पोलिसांनाही घटनास्थळी प्राचारण करण्यात आले हा सर्व प्रकार आजगाव वेतोबा मंदिर परिसरात घडला.
आजगाव सह आजूबाजूच्या गावात मायनिंग प्रकल्प प्रस्तावित आहे या मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे, याआधी बऱ्याचदा खाजगी कंपनीकडून गावात सर्वेक्षणाचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध करत अशा प्रकारचा ग्रामसभेचा ठरावही घेऊन जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. मध्य ग्रामस्थांचा विरोध असताना सोमवारी संबंधित मायनिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अत्याधुनिक ड्रोन द्वारे दाखवरे परिसरामध्ये सायंकाळी उशिरा सर्वेक्षण केले जात होते. यावेळी आकाशात ड्रोन उडत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात येतात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले ही बातमी हळूहळू गावात पसरतात ग्रामस्थांनी ड्रोन उडवणाऱ्या संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला काही वेळाने सदरचा ड्रोन हा मळेवाड परिसरात येणाऱ्या एका रिसॉर्ट मधून ऑपरेट केला जात असल्याचे समोर आले ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जात संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगल्यात जाब विचारला आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तिथून थेट आजगाव येथील श्री देव मंदिरात आणले यावेळी सुमारे 400 पेक्षा जास्त ग्रामस्थांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका लक्षात घेता आणि याबाबतची कोण कोण पोलीस यंत्रणेला लागतात वेंगुर्ला आणि सावंतवाडी पोलीस ठाण्याची पथके आजगाव परिसरात दाखल झाली.
त्यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवत पोलीस प्रशासनासमोरही तीव्र भावना व्यक्त केल्या. संतप्त ग्रामस्थांचा रोज पाहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अधिक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ ,शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुधन कवठणकर, जि प सदस्य संजय गावडे पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब मुळेवाड उपसरपंच हेमंत मराठे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल प्रभू आजगावकर प्रभारी सरपंच आजगाव सुशील कामतेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी संबंधित मायनिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत सदर ड्रोन सर्वेक्षणाला कोणी परवानगी दिली,आमच्या जमिनी,आमची घरे,मंदिरे आमच्या भविष्याबाबत चा निर्णय आम्हाला विश्वासात न घेता कोण घेत आहे? आमच्या गावात मायनिंग सारखे प्रकल्प नको असताना ही आमच्यावर जबदस्ती का? ह्या मागील सूत्रधार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित केले.या ड्रोन सर्व्हे मध्ये कोणाचे हितसंबंध आहेत असाही प्रश्न उपस्थित केला.
यावेळी ॲड.स्वप्नील आजगावकर यांनी ग्रामस्थांना शांत करत सदरील घटनेची लिखित प्रत सर्वांसमक्ष घेत प्रकरण शांत करून पुढील नियोजन साठी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच मायनिंग सारखा हा भस्मासुर गावातून हद्दपार होण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट दाखवत उपस्थित ग्रामस्थांनी श्री देव वेतोबा समोर नतमस्तक होऊन र्हाराणे घालत, मायनिंग प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. रात्री दोन वाजेपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. हळूहळू ग्रामस्थ शांत झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत घटनास्थळावरून हलवले एकूणच दोन सर्वेक्षणावरून उद्धवलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक बनले आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये मायनिंग प्रकल्पा विरोधात प्रचंड चिड निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या तरी संभाव्य संघर्ष टळला असला तरी, मायनिंगच्या मुद्द्यावरून आता पुढील काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
सत्ताधारी नेत्याचे
आजगाव मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ दाखल झाले होते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग यांचाही समावेश होता, यावेळी या ड्रोन सर्वेमागे नेमका कोणाचा हात आहे याबाबतची परवानगी कोणी दिली होती असा जाब ग्रामस्थांनी विचारताच संबंधित कंपनीच्या पथकाने एका प्रतिष्ठित नेत्याचे नाव घेत,त्यांनी सर्व्हे करण्यास सांगितल्याचे स्पष्ठ केले. सत्ताधारी नेत्याचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा पारा अधिकच चढला.त्यामुळे पदाधिकारीच जर असे नको असलेले प्रकल्प राबविण्यात मग्न असतील तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशा भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या.
नेमका सुत्रधार कोण?
निसर्गाने नटलेल्या या गावात आणि येथील नागरिक गुण्या गोविंदाने नांदताना एखादे चांगले प्रकल्प आणण्याचे सोडून विनाशकारी मायनिंग सारखे प्रकल्प आणण्याचा घाट कोण घालत आहे,याचा मुख्य सूत्रधार कोण? पडद्यामागची अदृश्य शक्ती कोण? याचा शोध घेणे आता गरजेचे आहे, या अदृश्य शक्तीला विरोध करून हा विनाशकारी प्रकल्प गावातून हद्दपार होण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.