सावंतवाडी,दि.०२ ऑगस्ट
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अंतर्गत गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्यासाठी गावांत शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी म.गां. तंटामुक्त गाव समिती,आरोंदा ची बैठक ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय आरोंदा येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी सदर सभेस सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून चर्चेत सक्रिय सहभाग घेऊन सर्वांच्या सहकार्यामुळे गाव तंटामुक्त ठेवण्याचे आवाहन, महात्मा गांधी तंटा गाव मोहिम समिती, आरोंदा यांनी केले आहे.