​सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब यांच्याकडून मोफत छत्री वाटप; उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेअर करा

सावंतवाडी, दि. १४ जून
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोफत छत्री वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
​विशाल परब यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, गरजू कुटुंबांना आधार देणे, तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अशा विविध कार्यांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात स्थान निर्माण केले आहे. याच सेवाभावी वृत्तीतून सध्या मतदारसंघात गरजू घटकांसाठी हा छत्री वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सत्ता किंवा पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या या कार्यपद्धतीचे मतदारसंघातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
​या उपक्रमादरम्यान सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, गुरु कल्याणकर, दादू कविटकर, बाळा आकेरकर, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, जिल्हा परिषद माजी सदस्य नितीन राऊळ, सदा राणे, प्रवीण पंडित, निलेश पटेकर, बाळा पेडणेकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर, मनोज कल्याणकर, बापू कदम आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी विशाल परब यांच्या जनसेवा उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा