सावंतवाडीतील छोट्या कबीरची गरुडझेप!

शेअर करा

सावंतवाडी,दि.०३ ऑक्टोंबर

सावंतवाडी येथील अवघ्या दहा वर्षांच्या कुमार कबीर हेरेकर याने आपल्या धावण्याच्या जिद्दीने आणि सातत्यपूर्ण मेहनतीने क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कामगिरीमुळे तो सातत्याने चर्चेचा विषय ठरत असून, त्याला प्रेमाने ‘द रनिंग मशीन’ तसेच ‘भाग कबीरा भाग’ या नावानेही ओळखले जाते.

अवघ्या दहा वर्षांच्या वयात कबीरने भारतभरातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत चमकदार कामगिरी केली आहे. आजपर्यंत त्याने तब्बल ७२ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, यामध्ये त्याने ५ किलोमीटरपासून २५ किलोमीटरपर्यंतचे अंतर पूर्ण केले आहे.

कबीरच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत कोल्हापूर-इचलकरंजी येथील HALS Socks या नामांकित कंपनीने त्याची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

HALS Socks ही कंपनी गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या वस्तू, जसे की सॉक्स, टॉवेल्स, टी-शर्ट्स आणि बँड्स यांचे उत्पादन करत आहे. विशेष म्हणजे, कबीर आपल्या धावण्याच्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच HALS Socks वापरत आहे.

कबीरच्या मते, HALS Socks वापरल्यामुळे धावताना त्याला आरामदायी अनुभव मिळतो. दीर्घ अंतराच्या धावणीनंतरही त्याला सॉक्समुळे त्वचेवर त्रास किंवा रॅशेस जाणवत नाहीत, त्यामुळे प्रशिक्षण आणि मॅरेथॉनदरम्यान त्याचा आत्मविश्वास वाढतो.

कबीरच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी HALS Socks कंपनीने त्याच्या नावाचे विशेष ब्रँडिंग असलेले ‘KABIR 29’ सॉक्सही तयार केले आहेत. कबीरच्या धावण्याच्या प्रवासातील हा एक अभिमानाचा आणि प्रेरणादायी टप्पा मानला जात आहे.

‘कष्टाचे फळ नक्कीच मिळते’ याचे सुंदर उदाहरण कबीरने आपल्या मेहनतीतून दाखवून दिले आहे. अवघ्या दहा वर्षांच्या या चिमुकल्या धावपटूची ही गरुडझेप निश्चितच प्रेरणादायी आहे.

कबीरची ही धाव इथेच थांबणार नाही. सावंतवाडीपासून सुरू झालेला त्याचा हा धावण्याचा प्रवास भविष्यात देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचेल, असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना आहे.

KABIR 29 × HALS SOCKS
धावण्याची जिद्द, मेहनतीची साथ आणि यशाची नवी वाट!

शेअर करा