निरंकारी मिशनचा योग दिन
सिंधुदुर्ग, २१ जून,
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या विविध शाखांमध्ये योग आणि आध्यात्मिक जागरूकतेवर आधारित कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
याच अंतर्गत जिल्ह्यातील संत निरंकारी भवन नियोजित सिंधुदुर्ग,जागा ओरोस (ता. कुडाळ), संत निरंकारी सत्संग भवन मातोंड, नियोजित जागा सातवायगणी (पेंढूर ता. वेंगुर्ले), शांतादुर्गा मंगल कार्यालय, सावंतवाडी शहर (ता. सावंतवाडी), तालुका स्कुल कणकवली शहर, (ता. कणकवली), मांडवकरवाडी, वारगाव (ता. कणकवली) निरंकारी सत्संग भवन, एनारी, (ता. वैभववाडी), मोहूळ वाडी, तिर्लोट (ता.देवगड) अश्या ०७ ठिकाणी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्रद्धालु भक्त, सेवादल स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनुभवी योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या योग सत्रात सहभागींनी योगाभ्यास करून निरोगी आणि संतुलित जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला.
सतगुरु माता जी अनेकदा आपल्या विचारांमध्ये ‘स्वस्थ मन सहज जीवन’ (निरोगी मन, सोपे जीवन) चा उल्लेख करत सांगतात की, आपले हे शरीर निरंकार प्रभूची देणगी आहे, ज्याला निरोगी ठेवणे हे आपले मूळ कर्तव्य आहे. म्हणूनच दीर्घायुष्य आणि सक्रिय, यशस्वी जीवनासाठी योग अत्यंत आवश्यक आहे.
या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम (ध्येयवाक्य) ‘स्वस्थ आयुष्यासाठी योग’ अशी होती, ज्याने हा संदेश दिला की खरे आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक संतुलनाचे समन्वित रूप आहे. याच भावनेला अनुसरून, संत निरंकारी मिशनने योगाला आत्मजागृती, शिस्त आणि सकारात्मक जीवन दृष्टीचे एक सशक्त माध्यम मानून जन-जागरूकतेला प्रोत्साहन दिले.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा जी यांच्या माहितीनुसार, मिशनद्वारे देशभरातील १५०० हून अधिक केंद्रांवर सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यांचा मुख्य उद्देश आरोग्य, मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक चेतना वाढवणे हा होता.
निसंदेह, निरंकारी मिशनद्वारे राबविण्यात आलेली ही जनकल्याणकारी मोहीम समाजाला आरोग्य, जागरूकता आणि सकारात्मक जीवन मूल्यांप्रती प्रेरित करत सर्वांगीण कल्याणाचा संदेश देते.