सिंधुनगरीतील सहकारी मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन; प्रशिक्षण व सहकारी चळवळीला गती देण्यासाठी अधिक सहकार्याचे आश्वासन.
सिंधुदुर्ग,दि.०१ जुन
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच सहकार्य मिळेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील नूतन कार्यालय उद्घाटना प्रसंगी केले. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुनगरी, ओरोस येथील मंडळाच्या नूतन कार्यलयाचे उद्घाटन नुकतेच बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे हस्ते फित कापून करण्यात आले.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या जयंती दिनाचे औचीत्य साधत नूतन कार्यालय उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, संचालक विलासराव ऐनापुरे, विनोद मर्गज, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळाचे सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधूदुर्ग जिल्हा म. सह. बँकेने जिल्हा सहकार मंडळाला सिंधु नगरी ओरोस येथे नूतन कार्यालय उपलब्ध करून दिले त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे आभार मानले. दि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे यांचे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्ग ही संस्था संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकारी शिक्षण,प्रशिक्षण प्रचार व प्रसिद्धीचे काम करते दिवंगत सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळ निकोप वाढीसाठी प्रयत्न केले त्यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून सहकार मंडळाच्या नूतन करण्याचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.