सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील एमएच ०७ पासिंग गाड्यांना मिळणार टोलमाफी – पालमकमंत्री नितेश राणे

शेअर करा

जन्मदिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासियांना दिली गोड बातमी ; जिल्ह्यातील वाहनांसाठी स्वतंत्र लेनचा रस्ता

सिंधुदुर्ग,दि.२३ जून
माझ्या जन्मदिवसानिमित्ताने या सिंधुदुर्गच्या जनतेने आम्हा राणे कुटुंबियांना व भाजपा पक्षाला नेहमीच मतदानरुपी आर्शिवाद भरभरुन दिलेले आहेत. त्या सिंधुदुर्गाच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच्या दिवशी काही द्याव , अशी भावना माझ्या मनामध्ये होती , जनतेची सेवा करणे हे माझे मुळ उद्दिष्ट आहे. जनतेचे प्रत्येक प्रश्न व समस्या सोडवणे आणि ते सोडवण्यासाठी कुठल्याही टोकावर जाणे हे संस्कार खा. नारायण राणे यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे जन्मदिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासियांना गोड बातमी देण्याचा निर्णय घेतला आहे. टोलमाफीच्या मागणीनुसारक ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गातील एमएच 07 पासिंग गाड्यांना मिळणार टोलमाफी दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वाहनांना स्वतंत्र लेन असेल अशी , माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


माध्यमांशी बोलताना ते म्हणाले , ओसरगाव येथील टोलनाक्यावर आम्हाला टोल लागणार का? केंद्र सरकार आपल्याला सहकार्य करेल का? अशी भावना सर्वांमध्ये होती. त्याच भावनेचा आदर करुन मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी शब्द दिलेला होता की, या बाबतीमध्ये निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढला जाईल. त्यामुळे आजच्या दिवशी माझ्या जिल्ह्यातील जनतेला सकारात्मर बातमी मी देत आहे. ओसरगाव मध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो काही टोल सुरु होत आहे, त्या टोलकडे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एमएच07 च्या गाड्या असतील, त्यासाठी विशेष लेन त्या टोलमध्ये ठेवली जाणार आहे. त्या लेनवरुन एमएच07 च्या गाड्या जावू शकतात, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही. ज्यांच्या कर्मशियल व्हेईकल आहेत , त्यांना 50 टक्के सवलत संबंधित कंपनीने जाहिर केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला काही देवू शकलो, त्यांच्या मनाचे समाधान करु शकलो , यापेक्षा मोठी भेट माझ्यासाठी असू शकत नाही, अशी भावनिक कबुली मंत्री नितेश राणे यांनी दिली.



मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्र्यांचे मानले आभार –


यानिमित्ताने हा निर्णय करण्यासाठी मला ख-या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी , खा.नारायण राणे , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार यांचे आभार मानतो. नामदार गडकरी यांनी जिल्हावासियांसाठी सहकार्य केले. ओसरगाव टोलनाक्यावर ज्यावेळी टोल सुरु होईल, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी एक लेन असेल त्यावरुन प्रवास करावा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

शेअर करा