‘डी. वाय.’ च्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ;सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक,विद्याप्रसाद बांदेकर,मेघनाथ धुरी यांची प्रमुख उपस्थिती
सिंधुदुर्ग,दि.२७ऑक्टोंबर
सन 2025-26 च्या हंगामात एफ.आर.पी. पेक्षा 175 रुपये जादा दर दिला आहे. एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची कारखान्याची परंपरा यापुढेही कायम ठेवून ऊसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
कारखान्याकडे 2026-27 च्या गळीत हंगामाकरीता 9 हजार 345 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार सतेज पाटील व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.मंगल कांबळे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.
कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक,विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी,कारखान्याचे व्हा.चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, महादेव पडवळ, धैर्यशिल घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, पांडुरंग पडवळ, उदय देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष इर्शाद शेख, साईनाथ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली पाटील, सभापती छाया देसाई, सदस्य अमर कांबळे, शुभांगी संकपाळ, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्थायी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी केले. आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मानले.