सिंधुदुर्ग : ‘लव्ह जिहाद’चे वाढते संकट आणि त्यावरील उपाययोजना यांवर झाराप येथे १३ जूनला विशेष व्याख्यान!

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि. १० जून

सिंधुदुर्ग : राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष कार्यक्रम शनिवार, १३ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता, झाराप येथील ‘हॉटेल आराध्य’च्या सभागृहात (झिरो पॉईंट, सिंधुदुर्ग) पार पडणार आहे.

या ज्वलंत विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील ठोस उपाययोजना यांवर मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘लव्ह जिहाद’ विषयावरील ग्रंथाचे लेखक श्री. रमेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि मुंबई येथील प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या व विधीतज्ज्ञ अधिवक्त्या (सौ.) प्रीती राऊत या देखील उपस्थितांना सविस्तर कायदेशीर व वैचारिक मार्गदर्शन करतील.

अमरावती येथे अयान अहमदने १८० हून अधिक मुलींचे शोषण करून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित केल्याची घटना असो, किंवा कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागांत सातत्याने समोर येणारी प्रकरणे असोत, सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. इतकेच नव्हे तर नाशिकमधील ‘टीसीएस’ (TCS) व पुणे येथील विप्रो (Wipro) सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय आस्थापनांमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकार उघडकीस आल्यामुळे आता सुशिक्षित आणि नोकरदार तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

‘द केरला स्टोरी’ सारख्या चित्रपटांतून हे भीषण वास्तव समोर येऊनही हिंदू समाजात अद्याप म्हणावी तशी जागृती झालेली दिसत नाही. ही संकटे पाहता जर आपण आजच योग्य ती पावले उचलली नाहीत, तर उद्या आपल्याही घरात अशी दुर्दैवी घटना घडू शकते, अशी भीती आता पालकांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या छुप्या संकटाचा सामना कसा करावा, याचे ठोस उपाय या व्याख्यानात सांगितले जातील.

आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व हिंदू बांधव, युवक-युवती, माता-भगिनी आणि विशेषतः पालकांनी आपल्या मुलींना सोबत घेऊन या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आपला नम्र,

श्री. संजय जोशी
हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ८९८३२६५७५९)

शेअर करा