Sindhudurg : सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर ९ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर

शेअर करा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आढावा बैठक; बैठकीनंतर पत्रकार परिषद

सिंधुदुर्ग,दि. ५ ऑक्टोंबर

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक ९ ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजता सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. दुपारी १ ते २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी निवारणाकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक होणार असून, आढावा बैठकीनंतर अध्यक्षांची पत्रकार परिषद होणार आहे.
दुपारी २ ते ३ वाजता (राखीव). सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्ग येथून मुंबईकडे प्रयाण.

शेअर करा