जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात उत्साहात अभिवादन कार्यक्रम संपन्न; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली.
सिंधुदुर्ग,दि.०१ जुन
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकारमहर्षी स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आठवण जागवली.
कार्यक्रमास बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई, सहकार क्षेत्रातील मान्यवर, तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. जाधव यांच्या सहकार चळवळीत दिलेल्या योगदानाचा गौरव करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी स्व. शिवरामभाऊ जाधव यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कार्याची परंपरा आजही सहकार क्षेत्राला दिशा देत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप स्व. शिवराम भाऊ जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करून करण्यात आला.