सिंधुदुर्ग:देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता

शेअर करा

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग,दि.२७ ऑगस्ट

देवघर धरणाची कमाल पाणी पातळी १८७.५० मीटर असून सद्यस्थितीत धरणातील पाणीपातळी १८५.७० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत मंजूर पाणीपातळी व विसर्गाचे नियमन करण्याचे वेळापत्रक (ROS) नुसार धरणातील पाणीपातळी १८५.६५ मीटरपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता दि. २८ ऑगस्ट २०२६ पासून सकाळी ७ वाजल्यापासून वीज निर्मितीसाठी ६.० क्युमेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदीपात्रात येऊन नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन दि. २८ ऑगस्टपासून पुढील कालावधीत नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकतो, हे लक्षात घेऊन जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल-कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा