कणकवली : स्नेहल तवटे चार्टर्ड अकाउंटंट; कणकवलीच्या कन्येची उल्लेखनीय कामगिरी

शेअर करा

सांगवेच्या स्नेहलचा यशस्वी शैक्षणिक प्रवास; एस. एम. हायस्कूल ते सीएपर्यंतच्या वाटचालीत कुटुंबीयांचे मोलाचे योगदान, सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव. 🎓👏📚

कणकवली,दि. २० जून

चार्टर्ड आकाउंटंड (सीए) परीक्षेत स्नेहल संतोष तवटे हिने यश संपादन केले. स्नेहल ही मूळ कणकवली तालुक्यातील सांगवे येथील रहिवासी असून सध्या कणकवली सोनगेवाडी येथे वास्तव्यास आहे. स्नेहल हिचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण कणकवली येथील एस. एम. हायस्कूल झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर कॉलेज येथे प्रवेश घेत त्याठिकाणी बी.कॉम. पदवी प्राप्त केली. तिने कणकवली कॉलेजमधून एम.कॉम. शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये वडील संतोष तवटे यांच्यासह कुटुंबीयांचे योगदान आहे. या यशाबद्दल स्नेहल हिचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. सीए अमोल खानोलकर यांच्याकडे स्नेहल हिने आर्टिकलशिप केले आहे.

शेअर करा