तळेरे : माझा सिंधुदुर्गचा शिष्यवृत्ती – शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न

शेअर करा

तळेरे,दि.१५ जून

माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व सलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आई / वडिलांचे छत्र गमावलेल्या व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी मराठा समाज सभागृह कुडाळ या ठिकाणी संपन्न झाला. या उपक्रमाचे हे ६ वे वर्ष होते.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जयदीप पाटील, प्रभारी पोलीस इन्स्पेक्टर कुडाळ पोलीस स्टेशन, दादा साईल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, साई जळवी फिल्मलाईन प्रोड्यूसर, दिग्दर्शक, अविनाश वालावलकर (जेष्ठ शिक्षक), विकास पालव (संस्थापक अध्यक्ष -माझा सिंधुदुर्ग ) , प्रशांत गावडे (माझा सिंधुदुर्ग जेष्ठ सभासद-सल्लागार, उद्योजक) , श्री सदाशिव धुपकर , मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल आरोस , किसन दुखंडे (निवृत शिक्षक ) सुनील पालव (उद्योजक ) , सौ तेजल नागवेकर (शिष्यवृत्ती उपक्रम प्रमुख )
सौ. नंदिनी सामंत ( सामाजिक कार्यकर्त्या , महिला जागृती) , नारायण आसयेकर (प्रसिद्ध दशावतार कलाकार) , इत्या. विविध शाळांचे शिक्षक – मुख्याध्यापक उपस्थित होते. त्याच प्रमाणे मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग येथील माझा सिंधुदुर्ग चे सभासद उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष विकास पालव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपक्रमाची माहिती, विद्यार्थ्यानी मिळवलेले यश, व साहित्य वितरण कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत याची माहिती उपस्थितांना दिली. पुढील वर्षी १२ वी नंतर च्या कोर्सेस साठी मदत तसेच संस्थेच्या उपक्रम समिती सदस्यांसाठी आपत्कालीन फंड उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगात व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन केले.दादा साईल यांनी उपक्रमाचे कौतुक करत जिल्हपरिषद मार्फत या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध मालवणी समालोचक श्री . बादल चौधरी यांनी केले.
यावेळी सिंधदुर्ग जिल्हयाच्या सर्व तालुक्यांतून निवडलेल्या १६० विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे ( दप्तर, इयत्तेप्रमाणे वह्या , पाटी पेन्सिल, पेन सेट, पेन्सिल सेट, रंगपेटी, परीक्षा पॅड, जॉमेट्री बॉक्स , पट्टी, कंपास पेटी, रंगपेटी स्केच पेन बॉक्स इत्या.) वाटप करण्यात आले.

त्यानंतर सर्व विद्यार्थी -पालक, मान्यवर व संस्थेचे सभासद यांच्यासाठी सहभोजन चे आयोजन करण्यात आले होते.

नियोजन समिती च्या सौ तेजल नागवेकर यांनी या उपक्रमासाठी मेहनत घेतलेल्या सदस्यांचे कौतुक केले व आर्थिक, वस्तुरुपात मदत केलेल्या सर्व सभासदांचे व उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील नवीन दप्तरे व साहित्य मिळाल्यानंतर चा आनंद दिसून आला तसेच पालकांनीही कृतज्ञता व्यक्त करत संस्थेचे आभार मानले .

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी माझा सिंधुदुर्ग – शिष्यवृत्ती नियोजन समिती चे सुधीर गावडे, पांडुरंग पालव, स्वप्नील तेली, संदीप साईल, प्रशांत दुखंडे , तेजल नागवेकर, उदय परब, अभिजित केरवडेकर ,कृष्णा कदम यांनी विशेष मेहनत घेतली तसेच स्वप्नील पालव , सुरेश वारंग , दिपक तोरसकर, मंदार पारकर, सचिन शिंदे , ओमकार कुबल , सुगंधा साईल, सिया साईल,आबा भोजने , चंद्रशेखर सावंत, यांनी महत्त्वाची कामगिरी निभावली . त्याच प्रमाणे रुपेश भितये , संदेश कावले , अनिल पाटील , गणेश पाडगावकर सागर राणे, हेमंत मोंडकर, संकेत पाटील ,तनुजा तुळसुळकर , रेणुका राऊळ , वसंत परब , गोविंद पालव , जगदीश तांबे यांनी विशेष उपस्थिती दाखवली .

शेअर करा