तळेरे, दि. १९ जून
फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित संस्थेचा 46 वा वर्धापन दिन नुकताच उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे विश्वस्त यशवंत उर्फ शशी उर्फ अण्णा पेंडूरकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा ( 75 वा वाढदिवस) मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध विठ्ठल नारकर यांच्या हस्ते श्री यशवंत पेंडूरकर व त्यांच्या पत्नी सौ. वंदना पेंडूरकर यांना पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देऊन सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यांच्या जीवनप्रवासावर त्यांची मुलगी सुप्रिया पेंडूरकर यांनी "माझ्या वडिलांचा जीवन प्रवास"हे पुस्तक लिहिले त्याचे अनावरण करण्यात आले. तसेच फणसगाव हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 75000/- रुपये माननीय यशवंत पेंडूरकर यांनी देणगी स्वरूपात दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्र बँकेचे निवृत्त अधिकारी प्रसन्न कुमार साळसकर यांनी 25000/- रुपये व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष नारकर यांनी सुद्धा 5000/- रुपये शाळेसाठी देणगी स्वरूपात दिले या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष सहदेव सीताराम नारकर, अध्यक्ष अनिरुद्ध विठ्ठल नारकर, उपाध्यक्ष महेश विश्राम नारकर, सेक्रेटरी संदेश नारकर कार्यवाहक किशोर नारकर कार्यकारणी सदस्य भाई नारकर, संतोष चव्हाण, माजी अध्यक्ष अशोक नारकर, सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालकल्याण विकास सभापती सौ.अनुराधा महेश नारकर, पंचायत समिती सदस्य समृद्धी संतोष चव्हाण, माजी विश्वस्त रमेश नारकर,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष नारकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अनुश्री नारकर, वाघिवरे गावचे बँक ऑफ महाराष्ट्र हेड ऑफिस पुणे येथील वरिष्ठ अधिकारी प्रसन्न कुमार राजाराम साळसकर,डॉ.सर्वेश नारकर, ग्रामपंचायत सदस्य फणसगाव कृष्णकांत आडीवरेकर मुख्याध्यापक विजय पाटील तसेच गावातील ग्रामस्थ, प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश दत्ताराम गावकर सर यांनी केले व आभार सौ.प्राजक्ता अनिल नलवडे यांनी मानले.