तळेरे : कवी अशोक लोटणकर यांना तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान : सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

शेअर करा

तळेरे,दि.१४ जून

पर्यावरणतज्ज्ञ तुषार शिवशरण यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार श्री व सौ.लोटणकर यांनी स्विकारला. हा कार्यक्रम कोल्हापूर येथील अयोध्या हाॅटेलच्या लवकुश सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याबद्दल त्यांचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.

श्री लोटणकर हे रत्नागिरी येथील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असतात. दुर्गम भागातील शाळांमध्ये (प्राथमिक शाळा) मराठीची आवड निर्माण करण्यासाठी त्यांच्या पुस्तकांचे ( बाल साहित्य) वाटप केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील आठ शाळांमधून आता पर्यंत कार्यक्रम झाले असून पुढच्या महिन्यात कुडाळ, देवगड मधल्या शाळेतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या प्रिया दामले, कोल्हापूरच्या मा.आमदार जयश्री जाधव, सीता ट्रस्ट चे अध्यक्ष शंकर अंदानी, सुरजीत दातार, कोळी सम्राट राजेश वेसावकर, अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री चित्रा साठे, नाट्य अभिनेत्री अंजली पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित होते.या संमेलनात नाट्य व साहित्य,कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. 

अशोक लोटणकर हे मूळचे साखरपा-जाधववाडी या गावातील असून ते बी.ई.एस.टी. मुंबई (बेस्ट) मधून आगार व्यवस्थापक Depot Manager या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या निराधार या कथासंग्रहाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. लोटणकर यांची साहित्यातील विविध प्रकारची एकुण २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून, त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे ३५ हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ते अनेक शैक्षणिक, सामाँजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत.

शेअर करा