पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
वैभववाडी ,दि. १९ ऑगस्ट
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पुढाकाराला यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार करण्यात आला. तब्बल ३८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने वैभववाडी येथील कार्यालयासमोर फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शिरोडा-वेळागर येथे ‘ताज’ प्रकल्प साकारल्याने सिंधुदुर्गातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे आम्ही मनापासून स्वागत करीत असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी सांगितले.
यावेळी जि प सदस्य श्रावणी रावराणे, जि प सदस्य रिद्धी सुतार, प स सदस्य देवानंद पालांडे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नासिर काझी, राजेंद्र राणे, महेश संसारे, संजय सावंत, स्वप्नील खानविलकर, स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, अनंत फोंडके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.