वेंगुर्ला ,दि.१५ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर वेताळ प्रतिष्ठानच्या पुढाकारातून तुळस येथे आयोजित केलेल्या सलग ३९ व्या रक्तदान शिबिरात तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, जि.प.सदस्य सुजाता पडवळ, सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मोळके, डॉ. सानिया खान, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, लोकमान्य बँकेच्या गौरी जुवेकर, कल्पेश माडकर, प्रकाश मालवणकर तसेच सिद्धार्थ कलाविष्कारचे साईराम तुळसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हे शिबीर वेताळ प्रतिष्ठान, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी तसेच सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते. दरम्यान मुळदे कृषी महाविद्यालयाच्या तुळस निवासी विद्यार्थ्यांनी ‘रावे’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वेताळ प्रतिष्ठानचे महेश राऊळ, मंगेश सावंत, सदगुरू सावंत, माधव तुळसकर, विवेक तिरोडकर, रोहन राऊळ, रोहित गडेकर, प्रदीप परुळकर, प्रसाद भणगे, सुधीर चुडजी, सानिया वराडकर, सुहास सावंत, नाना सावळ, सदानंद वराडकर, प्रज्वल परुळकर, नाना राऊळ, वैष्णवी परुळकर, प्रांजल सावंत, भूमी परुळकर, भक्ती भणगे, प्राची गोरे, भार्गवी परुळकर तसेच सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे धीरज तुळसकर, राज तुळसकर, अक्षय तुळसकर, शाम तुळसकर, निलेश तुळसकर, कृष्णा तुळसकर आदींनी मेहनत घेतली.लोकमान्य बँकेकडून सर्व रक्तदात्यांना पर्यावरण पुरक किट देण्यात आले.