वेंगुर्ला,दि.२६ मे
वेंगुर्ला तालुका वकिल संघटनेच्या झालेल्या सभेत पुढील तीन वर्षांसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी अॅड.श्रीकृष्ण ओगले यांची तर सचिवपदी अॅड.सागर ठाकूर यांची निवड करण्यात आली.
वेंगुर्ला तालुका वकित संघटनेची वार्षिक सभा 8 मे रोजी पार पडली. या सभेमध्ये मे 2026 ते एप्रिल 2029 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष-अॅड.श्रीकृष्ण ओगले, उपाध्यक्ष-अॅड.प्रकाश बोवलेकर, सचिव-अॅड.सागर ठाकूर, खजिनदार-अॅड.पूनम नाईक, सहसचिव-अॅड.श्रद्धा बावीस्कर तर सदस्य म्हणून अॅड.मनीष सातार्डेकर व अॅड.आरती गावडे यांचा समावेश आहे.
या सभेप्रसंगी अॅड.एन.जे.गोडकर, अॅड.जी.जी.टांककर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, अॅड.अक्षता राऊळ, अॅड.तेजश्री कांबळी, अॅड.सुनिल मालवणकर, अॅड.धनंजय झांटये, अॅड.वैदेही नरसुले, अॅड.नामदेव मठकर, अॅड.शुभदा सातोस्कर, अॅड.हर्षदा कुडव, अॅड. शुभांगी सडवेलकर आणि अॅड.भावना पोखरे आदी उपस्थित होते.