वेंगुर्ला,दि.२७ ऑगस्ट
येथे आज (२७ ऑगस्ट ) नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच येथील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ले बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. यावेळी नागरिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरवर्षी वेंगुर्ला बंदरावर नारळी पौर्णिमा सण बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा नारळी पौर्णिमेला वेंगुर्ला बंदर येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर विविध खाद्यपदार्थांचे स्टोलही यावेळी लावण्यात आले होते. या नारळीपौर्णिमे निमित्त सर्वप्रथम वेंगुर्ला तहसील कार्यालयामार्फत नायब तहसीलदार राजन गवस यांनी मानाचा नारळ सागराला अर्पण केला. यानंतर वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतरी, पंचायत समिती सभापती शंकर घारे, पत्रकार समिती अध्यक्ष दिपेश परब यांच्यावतीने समुद्राला मानाचे नारळ अर्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, रिया केरकर, काजल कुबल, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, युवराज जाधव, आर्किटेक्ट अनमोल गिरप, पत्रकार समितीचे दाजी नाईक, भरत सातोस्कर, सुरज परब, आरोलकर नर्सरीचे शिवराम आरोलकर, तुळस ग्रा प सदस्य सचिन नाईक, पोलीस प्रथमेश पालकर, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, रामा मळगावकर, जयेश सरमळकर, स्वप्नील तांबे, दीपा मठकर, सलोनी कांबळी, पूजा पोवार, प्रज्ञा पालकर यांच्यासहित इतर पोलीस कर्मचारी, होमगार्ड, वेंगुर्ल्यातील व्यापारी, विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था नागरिक यांच्यावतीने समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला बंदर, नावबाग समुद्र किनारा याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वेंगुर्ल्यात समुद्राला मानाचे नारळ अर्पण
नागरिकांची गर्दी
वेंगुर्ला: