तहसीलदार ओंकार ओतारी व देवस्थान मानकऱ्यांच्या हस्ते आपट्याच्या झाडाचे पूजन; भाविकांनी सोने लुटून एकमेकांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा.
वेंगुर्ला,दि.२१ ऑक्टोंबर
वेंगुर्ला येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात दसऱ्यानिमित्त बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२०) सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.
दसऱ्या दिवशी सायंकाळी मंदिरासमोरील प्रांगणात आपट्याच्या झाडाची सोने म्हणून शासकीय अधिकारी तहसिलदार ओंकार ओतारी व देवस्थान मानकरी यांनी विधीवत पूजा केली. त्यानंतर भाविकांनी हे सोने लुटले. यावेळी लुटलेले सोने प्रथम श्री रामेेश्वरासह परिवार देवतांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी एकमेकांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
फोटोओळी – रामेेश्वर मंदिर येथे बहुसंख्य भाविकांनी सोने लुटले