Vengurla : वाचन प्रेरणा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०६ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)-

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरवाचनालयातर्फे १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ३.३० वा. संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ही स्पर्धा तालुक्यातील ५वी ते ७वी तसेच ८वी ते १२वी विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धेसाठी “मला आवडलेले पुस्तक” या विषयावर स्पर्धकाने ५ मिनिटांमध्ये आपले मत व्यक्त करावयाचे आहे. दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३००, २५०, २०० तसेच ५००, ४०० व ३०० याप्रमाणे बक्षिसे दिली जातील. पालकांनी किंवा मुख्याध्यापकांनी स्पर्धकांची नावे, त्यांची इयत्ता व शाळेचे नाव आदी माहिती संस्थेच्या 9860162395 या मोबाईल क्रमांकावर १३ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत पाठवावी असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

शेअर करा